आलिशान बंगल्यात रेव्ह पार्टी ; शंभरावर मुला-मुली नशेत धूंद ; मध्यरात्री पोलिसांनी टाकला छापा


Rave party in a luxurious bungalow; over a hundred young men and women high on drugs; police raided at midnight. पुणे (7 जून 2026) : आलिशान बंगल्यामध्ये मध्यरात्रीनंतर सुरू असलेल्या कथित रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकल्याने खळबळ उडाली. शंभरावर मुले-मुली यावेळी नशेत आढळली तर मोठ्या प्रमाणावर मद्यासह गांजाचा साठा यावेळी सापडल्याची सांगण्यात आले. पुणे जिल्ह्यातील तुळापूर गावच्या हद्दीतील एका आलिशान बंगल्यात झालेल्या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण ?
या रेव्ह पार्टीबद्दल अपर पोलीस आयुक्त तेजस्विनी सातपुते यांनी माहिती देताना सांगितले की, लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तुळापूर परिसरात मध्यरात्री पार्टी सुरू होती आणि यासाठी कोणतीही परवानगी न घेता ही पार्टी सुरू होती. यावेळी 100 पेक्षा जास्त मुले आणि मुली उपस्थित होते.

त्यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडून दुपारी एक वाजल्यापासून ते रात्रीसाडे अकरापर्यंत परवानगी होती मात्र, त्यानंतर सुद्धा त्यांनी पार्टी सुरू ठेवली. यामध्ये अनेक तरुण 21 वर्षाच्या आतील असल्याची संभावना वाटत आहे. ज्यांनी हा बंगला उपस्थित करून दिला त्याचा यामध्ये काही संबंध आहे का? याबाबत पडताळणी करत आहोत.

आयोजकांनी यामध्ये कोणता भंग केला. लाखो रुपयांचे मद्य येथे आढळून आले आहेत. यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. येथे मद्य, तंबाखूजन्य पदार्थ आणि गांजा आढळला आहे. पार्टीसाठी असलेले तरुण हे कोणत्या भागातून आले याचा तपास सुरू आहे. पार्टीत सहभागी झालेल्या मुला मुलींची कसून चौकशी पोलिसांकडून केली जात असल्याचे त्या म्हणाल्या.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !