टीव्ही संच डोक्यावर पडल्याने 13 वर्षीय मुलीचा मृत्यू : आमोद्यात हळहळ


यावल (7 जून 2026)  : कपाटावरील दूरदर्शन संच (टीव्ही) अचानक डोक्यावर पडल्याने गंभीर दुखापत होऊन आमोदा, ता.यावल येथील बालिकेचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी ही घटना घडली. नाजमीन मोहम्मद इसहाक पिंजारी (13, रा.मस्जिदजवळ, आमोदा, ता.यावल) असे मृत बालिकेचे नाव आहे.

कपाटावरील टीव्ही डोक्यात पडला
नाजमीन ही रविवारी सकाळी सुमारे पाच वाजेच्या सुमारास आपल्या घरी असताना घरातील रिकाम्या कपाटावर ठेवलेला टीव्ही अचानक तिच्या डोक्यावर कोसळला. या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर मार लागला. घटनेनंतर कुटुंबीयांनी तातडीने नाजमीनला उपचारासाठी भुसावळातील रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. या घटनेने कुटुंबीयांसह गावकर्‍यांमध्ये शोककळा पसरली.

याप्रकरणी मुलीचे वडील मोहम्मद इसहाक इस्माईल पिंजारी (38) यांनी यावल पोलिसांना माहिती दिल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास एएसआय मोती पवार करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !