एटीएम कार्डाची अदलाबदली करीत भुसावळातील सेवानिवृत्ताला दिड लाखांचा गंडा


Retired man from Bhusawal swindled of ₹1.5 lakh through ATM card swap भुसावळ (8 जून 2026) : एचडीएफसी बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी आलेल्या सेवानिवृत्ताला बोलण्यात गुंतवत त्याच्याकडील एटीएमची अदला-बदली करीत भामट्याने खात्यातून एक लाख 45 हजारांची रोकड लांबवली. ही धक्कादायक घटना जामनेर रोडवरील एचडीएफसी बँकेबाहेर घडली. संशयीताविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजद्वारे संशयीताचा शोध सुरू करण्यात आला आहे.

बोलण्यात गुंंतवत कार्ड बदलले
तक्रारदार पोपट प्रदीप श्रीरामे (61) हे सेवानिवृत्त असून 6 जून रोजी दुपारी 1.55 वाजता ते जामनेर रोडवरील एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर अनोळखीने त्यांच्याशी संवाद साधत विश्वास निर्माण केला व पैसे काढण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडील एटीएम कार्डची अदला-बदली करीत नंतर या कार्डाद्वारे एक लाख 45 हजारांची रक्कम विड्राल केली. बँक खात्यातून पैसे विड्राल होत असल्याचा मेसेज प्राप्त होताच श्रीरामे यांनी बाजारपेठ पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार तेजस पारीसकर करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !