नरडाणा पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडी करणारी नरडाण्यातील टोळी गजाआड
दोन लाख 76 लाखांचा मुद्देमाल जप्त : दोन गुन्ह्यांची उकल ; तीन आरोपींना अटक
Major achievement by Nardana police : Nardana-based burglary gang put behind bars नरडाणा (ता.शिंदखेडा) (8 जून 2026) : नरडाणा पोलिसांनी घरफोडी करणारी नरडाण्यातील त्रिकूटांची टोळी गजाआड केली आहे तर आरोपींचा एक अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींनी शिंदखेडा तालुक्यातील डाबली, मेलाणे, नरडाणा गावातील चोर्यांची कबुली दिली असून दोन लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल काढून दिला आहे.
डाबलीत घरफोडी : आरोपी जाळ्यात
नरडाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 जून 2026 रोजी दुपारी 12 ते 7 जून रोजी पहाटे 4 वाजेदरम्यान डाबली, ता.शिंदखेडा) येथील अरुण मुरलीधर पाटील (43) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोख रक्कम, बेन्टेक्स पोतसह मोबाईल मिळून एकूण 74 हजार रुपयांचा ऐवज लांबवला. याप्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नरडाणा प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांना घरफोडीच्या तपासादरम्यान स्थानिक चोरट्यांबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले. पोलिसांनी गौरव सुरेश पवार (19), गोकुळ छगन भील (20) व बादल राजू सोनवणे (18, सर्व रा.नरडाणा) यांच्यासह अन्य एका एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील डाबली, मेलाणे, नरडाणा गावातील चोर्यांची कबुली देत दोन लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल काढून दिला आहे.
दोन लाख 76 हजारांचा मुद्देमाल जप्त
आरोपींकडून दहा हजारांची रोकड, 65 हजार रुपये किंमतीचे विविध कंपन्याचे सहा मोबाईल, सोन्याच्या रिंग, सोन्याचे काप मिळून दोन लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक धुळे विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नरडाणा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी निलेश मोरे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र महाले, उपनिरीक्षक विजय पाटील, उपनिरीक्षक रवींद्र शिंदे, पोलीस अंमलदार ललित पाटील, राकेश शिरसाठ, गणेश पाटील, नारायण गवळी, भरत चव्हाण, योगेश गिते, अनारसिंग पवार, धनेश कुंकारी, रवींद्र मोराणीस, विक्रांत देसले, चंद्रकांत साळुंखे, विजय माळी, विनोद कोळी, प्रशांत पाटील, सचिन बागुल, अनिल सोनवणे, भरत भगरे, सुनील पगारे, सुरजकुमार सावळे व होमगार्ड जितेंद्र रणदिवे आदींच्या पथकाने केली.



