पाचोरा हादरले : घर विक्रीच्या वादातून 42 वर्षीय प्रौढाला संपवले : आरोपीला अटक
Pachora Shaken: 42-Year-Old Man Killed Over House Sale Dispute; Accused Arrested पाचोरा (9 जून 2026) : पाचोरा शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. घर विक्रीच्या वादानंतर नातेसंबंधातील वादाने एकाने चाकूचे सपासप वार करीत 42 वर्षीय प्रौढाची हत्या केली. ही धक्कादायक घटना सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत दीपक कानडे (42) यांचा मृत्यू ओढवला असून पोलिसांनी संशयी आरोपी संतोष हरलाल कानडे (55) यास अटक केली आहे.
खुनाचे नेमके कारण काय ?
आरोपी व मयत हे एकमेकांचे नातेवाईक असून नातेसंबंधातील घर आरोपीने विक्री केल्यानंतर सोमवारी रात्री याच कारणावरून उभयंतांमध्ये वाद झाला व संशयीताने आपल्याजवळील चाकूने दीपक कानडे यांच्यावर सपासप वार केल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दीपक यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला तसेच तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयीताला अटक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.



