अमळनेर तालुक्यात भीषण अपघात : बस, कार, दुचाकी अपघातात सहा जण जागीच ठार


Horrific accident in Amalner Taluka: Six killed on the spot in collision involving a bus, a car, and a two-wheeler अमळनेर (9 जून 2026) : अमळनेर तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली असून या अपघातात तब्बल सहा जणांचा मृत्यू ओढवला आहे. अमळनेर-धुळे रस्त्यावरील मंगरूळजवळील हॉटेल वृंदावनजवळ हा अपघात घडला.

तिहेरी अपघातात सहा जण ठार
सूत्रांच्या माहितीनुसार, अमळनेरहून धुळेमार्गे चाळीसगाव येथे जाणार्‍या बस (एम.एच.13 सीयु 7540) ने दुचाकी क्रमांक (एम.एच.18 सी.8719) तसेच कार (क्रमांक जी.जे.19 ए.एफ.3147) ला धडक दिली. या अपघातात दुचाकीसह कारचा चेंदामेंदा झाला.

अपघातात सहा जणांचा मृत्यू
अपघातात कारमधील अनिता सुरेश महाजन, निर्मला नंदलाल महाजन, नंदलाल गोपाल महाजन, सुरेश विक्रम महाजन तसेच दुचाकीवरील निलेश सुखदेव तावडे (25) व सोनल गोपाळ जावरे (22, रा.उधना, सुरत, मूळ रा.धरणगाव) यांचा मृत्यू ओढवला तर बलेनो कार चालक आदित्य चंद्रकांत महाजन हे जखमी झाले.

112 ची तत्पर कारवाई
112 वर अपघाताची माहिती कळताच अमळनेर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, हेड कॉन्स्टेबल कैलास शिंदे, रवी पाटील, पोलीस पाटील भागवत पाटील हजर झाले. जखमींना 108 रुग्णवाहिकेने उपचारार्थ रवाना केले. मृतदेह शवविच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !