भुसावळातील पंचशील नगरात धाडसी घरफोडी ; दीड लाखांचे दागिने लंपास

घर बंद असताना अज्ञात चोरट्यांचा साधला डाव ; शेजारील घरातही चोरीची घटना


Daring burglary in Bhusawal’s Panchsheel Nagar ; jewelry worth ₹1.5 lakh stolen भुसावळ (9 जून 2026) : भुसावळ शहरातील पंचशील नगर परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी एक लाख 46 हजार 200 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

घरफोडीने उडाली खळबळ
बाजारपेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचशील नगर, जामनेर रोड येथील रहिवासी शुभम विनायक जामनकर (32) हे खाजगी नोकरी करतात. पत्नी प्रसूत झाल्याने त्या माहेरी गेल्याने घर बंद होते.

अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
7 जून रोजी सायंकाळी घरी परतल्यावर त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश केल्यानंतर हॉलमधील लोखंडी कपाट व त्यातील लॉकर उघडे असल्याचे आढळून आले. तपासणी केली असता कपाटातील सोन्याचे व चांदीचे दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. चोरीस गेलेल्या मालामध्ये सोन्याची अंगठी, गोलमणी, मंगळसूत्राचे भाग, ब्रेसलेट तसेच चांदीचे पैंजण, जोडवे व अंगठी यांचा समावेश आहे. चोरट्यांनी एकूण एक लाख 46 हजार 200 रुपयांचा ऐवज लांबवला. घरफोडीचा प्रकार 18 मे ते 7 जून दरम्यान घडला. विशेष म्हणजे, याच गल्लीतील कुसुम हिरासिंग चंदेले (70) यांच्या घरातही चोरी झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कांतीलाल केदारे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !