रावेरातील माहिती अधिकार कार्यकर्त्याविरोधात खंडणीचा गुन्हा


Extortion case registered against Right to Information activist from Raver रावेर (9 जून 2026) : ले आऊट मंजूर न होण्यासाठी माहिती अधिकारात विविध अर्ज टाकून हे अर्ज मागे घेण्यासाठी सुरुवातीला पाच लाख मागून तीन लाख रुपये द्यावेच लागतील म्हणत अन्यथा सोशल मिडीयावर बदनामीची धमकी देत दोन वेळा प्रत्येकी पाच-पाच हजार रुपये स्वीकारणार्‍या मा हिती अधिकार कार्यकर्त्याविरोधात रावेर पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने शहरात खळबह उडाली आहे.

असे आहे खंडणी प्रकरण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर येथील डॉ. शब्बीर कदीर शेख यांनी गट क्रमांक 1154 मधील प्लॉटचा लेआऊट मंजुरीसाठी नगरपरिषदेकडे अर्ज केला होता. हा लेआऊट मंजूर होऊ नये यासाठी संशयीत गयासउद्दीन सदरोद्दीन काझी (रा.कोतवाल वाडा, रावेर) यांनी विविध शासकीय कार्यालयांमध्ये माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज दाखल केले होते.

फिर्यादीनुसार, हे अर्ज मागे घेण्यासाठी काझी यांनी सुरुवातीला पाच लाख रुपयांची खंडणी मागितली होती. तडजोडीनंतर ही रक्कम तीन लाख रुपयांवर निश्चित करण्यात आली. त्यानुसार 16 मे रोजी अश्विनी मेडिकल येथे आणि 23 मे रोजी ज्ञानछाया डिस्ट्रीब्युटर्स येथे प्रत्येकी पाच हजार रुपये असे एकूण 10 हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप आहे.

तसेच उर्वरित रक्कम न दिल्यास मेट्रो हॉस्पिटल व मेडिकलविरोधात खोट्या तक्रारी करून व्यवसाय बंद पाडण्याची तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर बदनामी करण्याची धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे.

या प्रकरणी डॉ.शब्बीर शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून रावेर पोलीस ठाण्यात गयासउद्दीन काझी यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहेत. या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासाअंती स्पष्ट होणार असून, पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !