दहा हजारांची लाच भोवली : ब्राह्मणगाव ग्राममहसूल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
गणेश वाघ
Bribe of ₹10,000 proves costly: Brahmangaon Gram Revenue Officer caught in ACB trap भुसावळ (9 जून 2006) : दहा हजारांची लाच घेताना सटाणा तालुक्यातील ब्राह्मणगावच्या ग्राम महसूल अधिकार्याला एसीबीने अटक केली आहे. या कारवाईने महसूल प्रशासनातील लाचखोर हादरले आहेत. मनीषा नारायण बाविस्कर (36, पाठक मैदाण, सटाणा, जि.नाशिक) असे अटकेतील लाचखोराचे नाव आहे.
असे आहे लाच प्रकरण
मूळ तक्रारदाराला मौजे ब्राह्मणगाव येथे शेत गट क्रमांक 824 मधील क्षेत्रावरील भाऊसाहेब हिरे विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था सोसायटीतर्फे चार लाखांचा चढवलेला बोजा कर्ज माफ करण्यात आले होते मात्र सातबारा उतार्यावरील बोजा उतरवण्यात आला नव्हता. वारस नोंदीच्या वेळेस त्यांचे वेगळे नाव नमूद करण्यात आले होते. कागदपत्रांप्रमाणे नाव बदलून मिळण्यासाठी 26 मार्च व 15 एप्रिल 2024 रोजी अर्ज देण्यात आला व दोन्ही कामांसाठी मनीषा बाविस्कर यांनी मंडळाधिकारीसह स्वतसाठी दहा हजारांची लाच मागितली व याबाबत 16 एप्रिल रोजी नाशिक एसीबीकडे तक्रार करण्यात आली होती व 9 जून रोजी सापळा रचण्यात आल्यानंतर आरोपी महिलेला पकडण्यात आले.
यांनी केला सापळा
नाशिकचे पोलीस उपअधीक्षक स्वाती पवार, हवालदार शरद हेंबाडे, हवालदार युवराज खांडवी, चालक हवालदार विनोद पवार आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.


