बोदवडच्या सराफाला गंडा : सव्वादोन लाखांच्या सोन्याच्या रिंगा भामट्याकडून लंपास


Bodvad Jeweller Swindled : Gold Rings Worth ₹2.25 Lakhs Stolen by Fraudster बोदवड (10 जून 2026) : बोदवड शहरातील सराफा दुकानात कानातील बाळ्या घेण्याच्या बहाण्याने आलेल्या भामट्या ग्राहकाने दुकानदाराची नजर चुकवत दोन लाख 21 हजार रुपये किंमतीच्या 19 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या फॅन्सी रिंगा लंपास केल्या. याप्रकरणी बोदवड पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे नेमके प्रकरण
बोदवड शहरातील नगरपंचायत रस्त्यावरील रहिवासी उमरावसिंग उदयसिंग जैन यांचे सराफा बाजारात मदन ज्वेलर्स नामक सोने-चांदीच्या दागिन्यांचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास डोक्यावर टोपी घातलेला एक अंदाजे 45 वर्षीय अनोळखी व्यक्ती दुकानात आला. त्याने हिंदी भाषेत बोलत कानातील दोन ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बाळ्या दाखवण्याची मागणी केली. जैन त्यांनी त्याला विविध डिझाईन्स दाखवल्यानंतर, त्याने ते दागिने हातात घेऊन पाहिले आणि दुसर्‍या डिझाईन्स दाखवण्यास सांगितले. त्यानंतर, माझी पत्नी बाहेर उभी आहे, तिला घेऊन येतो असे सांगून तो घाई-घाईने दुकानाबाहेर पडला.

संबंधित व्यक्तीच्या अचानक निघून जाण्याने जैन यांना संशय आल्याने त्यांनी तत्काळ दुकानातील वस्तूंची तपासणी केली असता 19 ग्रम वजनाच्या फॅन्सी सोन्याच्या रिंगा गायब असल्याचे निदर्शनास आले. भामट्याने नजर चुकवून दागिने लंपास केल्याची खात्री पटता जैन यांनी बोदवड पोलिसात अज्ञात भामट्याविरोधात तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक आशिष लव्हागळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संतोष चौधरी करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !