पाच दिवसांवर मुलीचा साखरपूडा आल्यानंतर आईने प्रियकरासोबत पळून जात केले लग्न


Just five days before her daughter’s engagement, the mother eloped with her lover and got married जामनेर (10 जून 2026) : जामनेर तालुक्यातील एका गावातील एका धक्कादायक प्रकाराची सोशल मिडीयावर चर्चा सुरू आहे. घरात मुलीच्या साखरपुड्याची तयारी सुरू असतानाच नियोजित वधूच्या आईने पळून जात चक्क प्रियकरासोबत लग्न केले व त्याबाबतचे स्टेटस सोशल मिडीयात टाकले. या प्रकाराने दोन्हीकडील मंडळी बुचकळ्यात पडले व या बाबीची चर्चा आता होवू लागली आहे.

कुटूंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
प्रियकराने थेट आपल्या विवाहाचे फोटो व्हाट्सप स्टेटसवर ठेवल्यानंतर या लग्नाचा भांडाफोड झाला. यामुळे मुलीच्या वडिलांवर आणि संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

जामनेर तालुक्यातील एका कुटुंबात गुरुवारी मुलीचा साखरपुडा होणार होता. घरात सर्वजण आनंदाने साखरपुड्याची तयारी करत होते मात्र, दोन दिवसांपूर्वी अचानक मुलीची आई कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली. ऐन कार्यक्रमाच्या तोंडावर मुलीची आई बेपत्ता झाल्याने कुटुंबाची तारांबळ उडाली. नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांडे तिचा शोध सुरू झाला, मात्र तिचा कुठेही पत्ता लागत नव्हता.

कुटुंबीय महिलेची वाट पाहत असतानाच, दुसर्‍या दिवशी त्या महिलेच्या प्रियकराने मोबाईलवर एक स्टेटस ठेवले. हे स्टेटस पाहताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या स्टेटसमध्ये त्या महिलेने प्रियकरासोबत लग्न केल्याचे स्पष्ट दिसत होते आणि दोघांनी गळ्यात हार घालून फोटो काढले होते. लेकीच्या साखरपुड्याआधीच आईने नवीन संसार थाटल्याचे पाहून मुलगी आणि तिच्या वडिलांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

कुटूंबियांनी ही बाब पोलिसांना कळवत बदनामी होत असल्याचे सांगितले तर व्यथा ऐकून जामनेर पोलिसही चक्रावले व त्यांनी महिलेच्या प्रियकराला पोलीस ठाण्यात पाचारण करीत वादग्रस्त स्टेटस लगेच काढण्याचे आदेश देत कायदेशीर समज दिली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !