भुसावळात मध्यरात्री पोलिसांचे कोम्बिंग ; रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती
Police conduct midnight combing operation in Bhusawal ; known criminals screened भुसावळ (10 जून 2026) शहरातील वाढत्या गुन्हेगारीला ठेचण्यासाठी पोलीस प्रशासनाने सातत्याने शहरात कारवायांचा धडाका राबवला जात आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवले जात असून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती त्यात घेण्यात आली तर रेकॉर्डवरील टोळ्यांची तपासणी करण्यात आली. इराणी वस्तीतही पोलिसांनी कारवाई करीत काहींना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे तर काही घातक शस्त्रही मिळाल्याची माहिती आहे. लवकरच अधिकृत कारवाईची सविस्तर माहिती समोर येणार आहे.
संवेदनशील भागात कारवाई
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ
पोलीस प्रशासनाने शहरातील विविध भागांसह गुन्हेगारांची वस्ती, संशयितांची ठिकाणे, पसार आरोपींचे संभाव्य वास्तव्य तसेच संवेदनशील परिसरांमध्ये एकाच वेळी धडक कारवाई केली. या कारवाईदरम्यान अनेक व्यक्तींची पडताळणी, चौकशी आणि तपासणी करण्यात आली.
या विशेष कोंबिंग ऑपरेशनमध्ये अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, प्रोबेशनरी डीवायएसपी प्रशांत दरेकर यांचा प्रमुख सहभाग होता. त्याशिवाय जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, बाजारपेठ निरीक्षक राहुल वाघ, शहर निरीक्षक उद्धव डमाळे, भुसावळ तालुका पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, मुक्ताईनगर निरीक्षक आशिष अडसूळ सावदा सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, नशिराबाद पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक योगीता नारखेडे, बोदवड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक आशिष लवंगडे, निंभोरा पोलीस स्थानकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख तसेच वरणगाव पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बागुल यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा सहभागी झाला.


