एक लाख 20 हजारांची लाच भोवली : महसूल सहाय्यकासह दोघे एसीबीच्या जाळ्यात
अहिल्यानगर (10 जून 2026) : शेतजमिनीची नुकसान भरपाई मिळवून देण्याच्या मोबदल्यात एक लाख 20 हजारांची लाच मागणार्या अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक मंगेश विजय दुमणे व श्रींगोदा-पारनेर कार्यालयातील कंत्राटी कर्मचारी अमोल कानीफनाथ खामकर यांना अहिल्यानगर एसीबीने अटक केली आहे. या कारवाईने महसूल वर्तुळातील लाचखोर धास्तावले आहेत.
असे आहे लाच प्रकरण
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) अहमदनगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा तालुक्यातील तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची जमीन राष्ट्रीय महामार्ग 548-डी प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती. या संपादित जमिनीच्या नुकसानभरपाईपोटी शासनाकडून एक कोटी 47 लाख रुपयांचा अंतिम व पूरक पुरस्कार मंजूर करण्यात आला होता मात्र, ही भरपाई मिळवून देण्यासाठी संबंधित प्रकरणातील अधिकारी व कर्मचार्यांनी तक्रारदाराकडे एक लाख 20 हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस निरीक्षक छाया देवरे, कॉन्स्टेबल गजानन गायकवाड, सचिन सुद्रुक, वैभव सुपेकर आदींच्या पथकाने केली.


