इथे ओशाळली माणुसकी : आईच्या तेराव्याच्या खर्चावरून वाद : मोठ्या भावाने लहान भावाला संपवले


नवी दिल्ली (11 जून 2026) : आईच्या तेराव्याच्या खर्चावरून दोन भावांमध्ये वाद झाल्यानंतर मोठ्या भावाने थेट बंदूक काढून लहान भावावर गोळी झाडल्याने यात भावाचा अंत झाला. मुले आईच्या तेराव्याच्या खर्चावरून या थराला जातील असा विचार कोणीच केला नव्हता. गोरखपूरच्या पिपराईच भागात ही हृदयद्रावक घटना घडली.

तेराव्याच्या खर्चावरून वाद
ज्या आईने नऊ महिने पोटात सांभाळलं, कष्टाने मुलांना शिकवलं, मोठं केलं, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण केली, स्वतः उपाशी राहून मुलांना पोटभर जेवू घातलं, ती आई जेव्हा हे जग सोडून गेली, तेव्हा तिची मुलं तिच्या तेराव्याचा खर्चही करू शकली नाहीत. चार मुलांच्या आईचं निधन झाल्यावर तेराव्यासाठी मोठा भाऊही आला होता. तेराव्याचा खर्च आणि आईच्या संपत्तीवरून दोन भावांमध्ये बाचाबाची सुरू झाली. पाहता-पाहता वाद इतका वाढला की, मोठा भाऊ दुर्गविजय याने बंदूक काढून लहान भाऊ शुभम याच्यावर गोळी झाडली. गोळी थेट शुभमच्या छातीत लागली. तो गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळला. कुटुंबातील सदस्यांनी तत्काळ त्याला रुग्णालयात नेलं मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेनंतर गावात तणावाचं वातावरण निर्माण झाले.

भावाने भावावर झाडली गोळी
आईच्या निधनाचं दु:ख कुटुंब अजून विसरलंही नव्हतं, तोच मुलाचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावात शांतता पसरली आहे. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचताच पोलिसांचं पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं. एसपी नॉर्थ ज्ञानेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आईच्या तेराव्याच्या खर्चाच्या वादातून भावाने भावावर गोळी झाडली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जात आहे.गोरखपूरच्या पिपराईच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगल धूषण बडकी रेतवाहिया गावात ही घटना घडली आहे. पोलिसांनी जेव्हा कुटुंबाकडे चौकशी केली, तेव्हा समजलं की मोठा भाऊ वेगळा राहत होता. तो आईच्या तेराव्यासाठी आला होता आणि पैशांच्या खर्चावरून लहान भावाशी वाद घालू लागला. वाद इतका वाढला की मारामारीची वेळ आली. तितक्यात त्याने बंदूक काढून गोळी झाडली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !