धुळ्यातील देवपूर पोलिसांची मोठी कामगिरी : केबल वायर चोरी करणारी हिंगोलीची टोळी जाळ्यात

9.50 लाखांचा मुद्देमाल हस्तगत : आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी


Major achievement by Dhule’s Deopur police : Hingoli-based gang stealing cable wires nabbed.धुळे (11 जून 2026) : देवपूर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने केबल वायर चोरी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश करत सहा आरोपींना अटक केली आहे. आरोपींच्या ताब्यातून तब्बल 9 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील केबल वायर चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार आहे.

काय घडले धुळ्यात ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 जून 2026 रोजी रात्री सुमारे 2 वाजेच्या सुमारास देवपूर पोलीस ठाण्याचे शोध पथक देवपूर परिसरात गस्त घालत असताना एका बागेजवळ संशयास्पदरीत्या उभे असलेले पिकअप वाहन (एम.एच.38 एक्स.2744) आढळले. वाहनाजवळ चार इसम जमिनीतून खोदून काढलेली केबल वायर पिकअपमध्ये भरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

संशय आल्याने पोलिसांनी चौकशी केली असता संबंधित इसमांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. अधिक चौकशीनंतर त्यांनी साथीदारांच्या मदतीने केबल वायर चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींच्या माहितीवरून प्रभात नगर परिसरातून दुसरे पिकअप वाहन (एम.एच.18 बी.जी.9377) आणि इतर साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले.

हिंगोलीतील टोळी जाळ्यात
अटकेतील आरोपींमध्ये करण भादूर शिंदे (26, रा.जवळाबाजार, ता. औंढा नागनाथ, जि.हिंगोली), अर्जुन म्हसू शिंदे (19, रा. जवळाबाजार, ता. औंढा नागनाथ, जि.हिंगोली), सागर रमेश शिंदे (18, रा. जवळाबाजार, ता. औंढा नागनाथ, जि.हिंगोली), कृष्णा काशीनाथ कुंवर (34, रा.वडणे-बुरसुड, ता. धुळे), किसन देशिंग शिंदे (37, रा.शेख लाल नगर, जवळाबाजार, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली), सतीष मारोती धोतरे (29, रा.वडारवाडा दुरी, ता.परभणी) यांचा समावेश आहे.

नऊ लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त
आरोपींच्या ताब्यातून चार लाख 20 हजार रुपये किंमतीचे पिकअप वाहन (एम.एच.38 एक्स. 2744), चार लाख 40 हजार रुपये किंमतीची पिकअप वाहन (एम.एच.18 बी.जी.9377), 15 हजार रुपये किंमतीचे 10 मीटर लांबीच्या केबल वायरचे 22 तुकडे, 75 हजार रुपये किंमतीची 125 मीटर लांबीची केबल वायर मिळून एकूण 9 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपींविरोधात देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी समाधान वाघ, उपनिरीक्षक गणेश आघाव, पोलीस अंमलदार मिलिंद सोनवणे, महेंद्र भरणे, भटेंद्र पाटील, राहुल गुंजाळ, राजेश हिरे, वसंत कोकणी, शुभम बोरसे, नितीन चव्हाण, सौरभ कुटे, शेखर देशमुख, प्रवीण खैरनार आदींच्या पथकाने केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !