साकळीजवळ कारला अपघात : किनगावातील चालक जखमी


यावल (11 जून 2026) : साकळी, ता.यावल या गावाच्या बसस्थानकाजवळ गुरूवारी सायंकाळी यावलकडून चोपड्याकडे भरधाव वेगात मारुती सुझुकीची वॅगनर कार (क्रमांक एम. एच. 05 ए. एस. 5019) वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. या अपघातामध्ये वाहनातील राजू रमेश पाटील (27, रा.साईबाबा नगर, किनगाव) हा गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला, छातीला, कमरेला जबर दुखापत झाली आहे.

गंभीर जखमी अवस्थेत नागरिकांच्या मदतीने त्याला यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार सोनवणे, अधिपरिचारीका माधुरी ठोके, बापू महाजन आदींनी त्याच्यावर प्रथमोपचार केले. चालकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचाराकरीता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले. अपघात नेमका कसा घडला हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !