यावल पंचायत समितीच्या आवारात ग्रामपंचायत अधिकार्‍यास अश्लील शिविगाळ


यावल (11 जून 2026) : यावल पंचायत समितीच्या आवारात रावेर पंचायत समितीच्या ग्रामपंचायत अधिककारी 40 वर्षीय महिलेला कौटुंबिक वादाच्या कारणावरून दोघांनी अश्लील शिविगाळ करीत धमकी दिली. ही घटना बुधवारी घडली. या प्रकरणी यावल पोलिसात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले यावल शहरात ?
यावल पंचायत समितीच्या आवारात रावेर पंचायत समितीच्या ग्रामपंचायत अधिकारी 40 वर्षीय महिला या कामानिमित्त आल्या होत्या. दरम्यान त्यांच्याशी असलेल्या कौटुंबिक वादाच्या कारणावरून येथे गणेश काशिनाथ कोळी (रा.जिल्हा बँक कॉलनी खोटेनगर, जळगाव) व रतन रमेश बाविस्कर (रा.कांतीलाल नगर, बांभोरी ता.धरणगाव) या दोघांनी महिलेशी वाद घातला आणि महिलेला अश्लील शिविगाळ करीत तिच्या अंगावर धावून आले आणि तिला धमकी दिली. या प्रकरणी यावल पोलिसात महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमित तडवी करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !