पारोळा पोलिसांची कामगिरी : मारोती मंदिरातील दागिने चोरणार्‍या भामट्याला अटक


पारोळा (13 जून 2026) : पारोळा तालुक्यातील पिंपरखेड येथील प्रसिद्ध मारुती मंदिरात अज्ञात चोर्‍यांनी डल्ला मारत मूर्तीचे चांदीचे दागिने लांबवले होते. पारोळा पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे.

काय आहे प्रकरण ?
तक्रारदार आसाराम त्र्यंबक पाटील (69, रा.बहादरपूर, ता. पारोळा) हे पिंपरखेड येथील मारुती मंदिरात पूजारी आहेत. 9 जून 2026 रोजी सकाळी 5.30 वाजेच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे राम मंदिराचा दरवाजा उघडून मारुती मंदिराजवळ आले. मंदिरात झाडू मारत असताना, त्यांना मारुतीच्या मूर्तीवरील चांदीचा मुकुट आणि कानावरील चांदीची मासळी गायब असल्याचे दिसून आले. चोरांनी गाभार्‍यात प्रवेश करून मूर्तीचे दागिने चोरून नेले होते तर गळ्यातील चांदीचा हार मात्र तिथेच मिळून आला.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलीस निरीक्षक योगेश महाजन, हवालदार संदीप सातपुते, कैलास साळुंखे यांनी या प्रकरणाचा तपास केला. यात तालुक्यातील हिरापूर येथील आरोपी हिरालाल अरुण पाटील यास अटक करुन मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !