पारोळ्यात एक लाख 86 हजारांचा गुटखा जप्त
Gutkha worth ₹1.86 lakh seized in Parola पारोळा (13 जून 2026) : अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईत शहरातील तलाठी कॉलनी भागातील एका घरात प्रतिबंधीत असलेला एक लाख 86 हजार रुपये किंमतीचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला. एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे प्रकरण ?
अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी शरद मधुकर पवार यांना माहिती मिळाली होती की, पारोळा शहरातील एका ठिकाणी गुटख्याचा साठा करण्यात आला आहे प त्यांनी याची माहिती पारोळा पोलीस स्थानकाला देऊन एका ठिकाणी छापा टाकला. यात महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेल्या गुटख्याचा साठा आढळून आला. हा साठा कैलास गणेश चौधरी असल्याची माहिती समोर आली.


या अनुषंगाने पोलिसांनी संबंधीत साठा तपासला असता यात तब्बल एक लाख 86 हजार 914 रूपयांचा गुटखा आढळून आला. यावरून अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी शरद मधुकर पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून कैलास गणेश चौधरी (38, रा.तलाठी कॉलनी, पारोळा ) याच्या विरोधात पारोळा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.

