अमळनेरातील ज्युनियर कॉलेजचे प्रा.अनिल पाटील यांचा अपघाती मृत्यू


Prof. Anil Patil of the Junior College in Amalner dies in an accident अमळनेर (14 जून 2026) : शहरातील जय योगेश्वर ज्यूनियर कॉलेजचे प्रा.अनिल दयाराम पाटील यांचा मोटरसायकलवर अपघात झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची घटना शनिवार, 13 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ढेकू रोडवर पोलीस स्टेशनजवळ घडली.

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक
अनिल पाटील हे आपल्या दुचाकी (एम.एच.19 बी.एक्स.9513) ने आपल्या गावी तरवाडे येथे गेले असता परतीच्या प्रवासात ते एकाला रस्त्याच्या बाजूला पडलेले आढळून आले. कुठल्यातरी अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !