रस्ता ओलांडणार्‍या दुचाकीला भरधाव बसने उडवले : धुळ्यातील तिघे जागीच ठार

बस चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा : वरखेडे गावावर शोककळा


Speeding bus rams into two-wheeler crossing the road ; three from Dhule killed on the spot धुळे (14 जून 2026) : वळण रस्त्याने दुचाकी रस्त्यावर येत असताना ताशी शंभर वेगाने धावणार्‍या ट्रॅव्हल्सने धडक दिल्याने धुळे तालुक्यातील वरखेडे गावातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात पारोळा रोडवरील शेतकरी शिल्प परिसरात रविवारी पहाटे घडला. लक्झरी बसने दुचाकीला धडक दिल्याने मृतदेहांचा अक्षरशा चेंदामेंदा झाला व दृश्य पाहून अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला. लक्झरी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. सुभाष लखन धनगर (42), नीलेश संभाजी पाटील (39) व सिंधुबाई शांताराम पाटील (83, वरखेडे, ता.धुळे) अशी मृतांची नावे आहेत.

भरधाव ट्रॅव्हल्सच्या धडकेने अपघात
सिंधुबाई यांचा मुलगा सुरतला वास्तव्यास असून नातेवाईकांचे निधन झाल्याने त्या सुरतकडे निघाल्या होत्या व त्यांना सोडण्यासाठी सुभाष धनगर व नीलेश पाटील दुचाकी (एम.एच.39 ए.डी.5568) ने निघाले होते. वरखेडे रस्त्यावरून डाव्या हाताने वळण घेत असताना भरधाव वेगाने आलेल्य पाचोर्‍यातील साईनाथ ट्रॅव्हल्सच्या लक्झरीने उडवल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला.



चालकाविरोधात गुन्हा
या प्रकरणी सिंधुबाई पाटील यांचे पुत्र रघुनाथ पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लक्झरी चालक अशोक भीला पाटील (रा. सावरखेडा, ता. पाचोरा) याच्याविरुद्ध आझादनगर पोलिसात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !