चोपडा तालुक्यातील तरुणाची तापी नदीत आत्महत्या


अमळनेर (14 जून 2026) : चोपडा तालुक्यातील बुधगाव येथील एका 26 वर्षीय तरुणाने तापी नदी पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना 11 रोजी रात्री साडेबारा वाजता जळोद येथे घडली. तेजस राजेंद्र सोनवणे (26) असे मृताचे नाव असून आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

काय आहे प्रकरण
तेजसने 11 जून रोजी रात्री 12.30 वाजता जळोद शिवारात तापी पुलावर मोटरसायकल लावून बूट मोजे काढून पुलावरून तापी नदीत उडी घेतली. प्रकाश कोळी, हिंमत भोई यांनी नदीत उड्या मारून तेजस याला बाहेर काढले. त्याला खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मयताच्या काकाने अमळनेर पोलिसात फिर्याद दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हेड कॉन्स्टेबल विजय भोई करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !