चोपडा पोलिसांची मोठी कारवाई : गावठी कट्ट्यासह आरोपी जाळ्यात


Major crackdown by Chopda police: Accused nabbed with a country-made pistol. चोपडा (14 जून 2026) : चोपडा पोलिसांनी बेकायदेशीररीत्या गावठी कट्टा बाळगणार्‍या एकाला अटक केली आहे. आरोपीकडून गावठी कट्टा, दुचाकी आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शनिवार, 13 जून 2026 रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मामलदे (ता.चोपडा) गावाजवळील शनिमंदिरासमोरील रस्त्यावर संशयीत विनोद वसंतराव पावरा (24, रा. अमळवाडी, ता. चोपडा) याच्या ताब्यातून सुमारे 30 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा, 45 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 सी.एस.6198) तसेच सुमारे 10 हजार रुपये किंमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल असा एकूण 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज वाघुंजे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !