धक्कादायक ! : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंना मारहाण
राजस्थानमधील जयपूरमध्ये आंदोलनावेळी घडली घटना : संशयीत ताब्यात
जयपूर (15 जून 2026) : कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांना दोन तरुणांनी कानशिलात लगावल्याचा धक्कादायक प्रकार जयपूरातील आंदोलनावेळी घडला. यावेळी पक्षाच्या समर्थकांनी त्या दोघांना पकडून मारहाण केली.सोमवारी, अभिजीत नीट पेपरफुटी, शिक्षण व्यवस्था, बेरोजगारी आणि तरुणांशी संबंधित इतर समस्यांविरुद्धच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले होते. अभिजीत यांच्या नेतृत्वाखाली शेकडो आंदोलक शहीद स्मारकावर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते.
समर्थकांमध्ये संघर्ष, अनेक फोन चोरीला गेले
आंदोलनादरम्यान, घोषणाबाजीवरून काही तरुणांमध्ये वाद झाला. पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले. आंदोलनस्थळी अनेक आंदोलकांचे मोबाईल फोनही चोरीला गेले. व्यासपीठावरून आपले मोबाईल फोन आणि सामान सुरक्षित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.


आंदोलनात सहभागी झालेले तरुण ‘मी माझ्या देशावर प्रेम करतो, मी भ्रष्टाचार नाकारतो’ आणि ‘पेपरफुटी थांबवा’ यांसारख्या घोषणा असलेले फलक आणि तिरंगा घेऊन आले होते. काही महिला आपल्या लहान मुलांसोबत आंदोलनात सामील झाल्या. कार्यकर्त्यांनी शहीद स्मारकाच्या प्रवेशद्वारावर झुरळाचे चित्र काढले आणि धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या! अशी घोषणा लिहिली. ज्या तरुणाने त्यांना थप्पड मारली तो म्हणाला, हे लोक जिहादी मानसिकतेचे आहेत. ज्या तरुणाने त्यांना थप्पड मारली तो म्हणाला, मी जयपूरचा आहे. मी एक राष्ट्रवादी आहे. हे लोक जिहादी मानसिकतेचे आहेत. हा अभिजीत दीपक विनाकारण देशाची दिशाभूल करत आहे. ही पेपरफुटी केवळ एक निमित्त आहे.

