जळगाव एसीबीची भुसावळात मोठी कारवाई : सहकार विभागाचे प्रमाणित लेखा परीक्षक जाळ्यात तर सहकार अधिकारी मात्र पसार

30 हजारांची लाच भोवली : कारवाईने सहकार विभागातील लाचखोर हादरले


गणेश वाघ
Major operation by Jalgaon ACB in Bhusawal: Certified Auditor from the Cooperation Department nabbed, while the Cooperation Officer remains at large भुसावळ (15 जून 2026) : सावकारीचे लायसन्स मिळवून देण्यासाठी तडजोडीअंती 30 हजारांची लाच स्वीकारताना भुसावळातील सहकारी संस्था कार्यालयातील दोन लेखा परीक्षकांना जळगाव एसीबीने सोमनाथ दुपारी रंगेहाथ अटक केली तर सहकार अधिकारी मात्र सापळ्याची कुणकुण लागताच पसार झाला. एसीबीच्या धडक कारवाईने सहकार विभागातील लाचखोर हादरले आहेत.

या संशयीतांवर कारवाई
प्रमाणित लेखापरीक्षक सुरेश जनार्दन विसपुते (62, माऊली नगर, रेणुका माता मंदिराजवळ, राजस्थान मार्बलमागे, भुसावळ) व प्रमाणित लेखापरीक्षक हेमंत प्रकाश काळे (40, विवेकानंद नगर, जिल्हापेठ जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे असून वर्ग तीनचा सहकार अधिकारी विजय विनायकराव गरूड हा सापळ्याची कुणकुण लागताच पसार झाला आहे. बाजारपेठ पोलिसात या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असे आहे लाच प्रकरण
भुसावळातील एका तक्रारदाराला सावकारीचे लायसन्स हवे असल्याने त्यांनी संंबंधित कार्यालयाशी संपर्क साधला असता संशयीतांनी 30 हजारांची लाच मागितली मात्र तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी जळगाव एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर सोमवार, 15 रोजी सापळा रचण्यात आला. दोघा प्रमाणित लेखा परीक्षक लाचेची रक्कम घेण्यासाठी भुसावळच्या नाहाटा चौफुलीवर सोमवारी दुपारी चार वाजता पोहोचले मात्र लाच स्वीकारताच दबा धरून असलेल्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले तर सापळ्याची कुणकुण लागताच अधिकारी विजय गरूड पसार झाला.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत नागरे व पोलीस निरीक्षक रेशमा अवतारे, ग्रेडेड उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, ग्रेडेड उपनिरीक्षक सुरेश पाटील, हवालदार किशोर महाजन, प्रणेश ठाकूर, हवालदार बाळू मराठे आदींच्या पथकाने यशस्वी केला. तपास पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !