धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रभारी निरीक्षकपदी ज्ञानेश्वर वारे
Dnyaneshwar Ware appointed as In-charge Inspector of the Dhule Local Crime Branch धुळे (16 जून 2026) : धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम मोठाभाऊ पवार यांची नाशिक ग्रामीणमध्ये बदली झाल्यानंतर रिक्त जागेवर शिंदखेडा ठाण्याचे प्रभारी ज्ञानेश्वर लक्ष्मण वारे यांची वर्णी लागली आहे. धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी नियुक्ती संदर्भातील आदेश सोमवारी काढले आहेत.
काय म्हटले आहे आदेशात ?
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी काढलेल्या आदेशानुसार, शिंदखेडा प्रभारी ज्ञानेश्वर वारे यांनी शिंदखेड्यातील पदभार तसेच आपल्याकडील प्रलंबित केसेस, गोपनीय प्रशासकीय कागदपत्रांचा कारभार एपीआय दीपक ढोके यांच्याकडे सोपवावा व गुन्हे शाखेचा तात्पुरता स्वीकारावा, असे आदेशात नमूद आहे शिवाय निरीक्षक अभिजीत सोनवणे यांनी गुन्हे शाखेचा पदभार वारे यांच्याकडे सोपवून सायबर शाखेचा पदभार स्वीकारण्याचे आदेशात नमूद आहे.
डॅशिंग अधिकारी म्हणून ओळख
ज्ञानेश्वर वारे यांची डॅशिंग अधिकारी म्हणून ओळख आहे. धुळ्यासह नंदुरबार जिल्ह्यात त्यांनी सेवा बजावत अनेक धडक कारवाया केल्या आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा निश्चितपणे नूतन नियुक्तीतही होणार असल्याचा आशावाद व्यक्त होत आहे.




