भारतीय वायुसेनेतील अधिकार्याच्या 24 वर्षीय पत्नीवर बलात्कार : धर्मांतराचाही आरोप
24-year-old wife of Indian Air Force officer raped; allegation of forced conversion also raised. नागपूर (16 जून 2026) : भारतीय वायुसेनेत नोकरीला असलेल्या अधिकार्याच्या 24 वर्षीय पत्नीवर ज्युसमध्ये गुंगीचे औषध देवून अत्याचार करण्यात आला व या घटनेचे चित्रीकरण करीत आरोपीने पीडीतेवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडीतेच्या तक्रारीनुसार, आरोपीने या प्रकारानंतर जबरदस्तीने तिला ईस्लाम कबुल करण्यासाठी दबावही टाकला आहे.
धर्मांतराबाबत व्हिडिओ समोर
24 वर्षीय पीडीतेचा आरोपी अयाज ताज मदारे हा तिचा शाळेतील जुना वर्गमित्र आहे. अयाज तिच्यावर धार्मिक मंत्रांशी संबंधित विधी करत असे. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करत असे. धर्मांतराशी संबंधित एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये अयाज तिचे हात धरून धार्मिक मंत्र वाचताना दिसत आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडितेचा पती भारतीय वायुसेनेत असून दुसर्या शहरात कार्यरत आहे. महिला प्रॉपर्टी डीलिंगचे काम करते. फेब्रुवारी 2025 मध्ये आरोपी अयाजने प्लॉट खरेदी करण्याच्या बहाण्याने तिच्याशी संपर्क साधला होता. एफआयआरनुसार, आरोपीने महिलेला वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये बोलावले. महिलेचा आरोप आहे की, तिथे तिला नशीला पदार्थ मिसळलेले ज्यूस पाजण्यात आले. बेहोश अवस्थेत तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि तिचे फोटो-व्हिडिओ बनवण्यात आले.
नंतर याच आक्षेपार्ह व्हिडिओंच्या माध्यमातून तिला ब्लॅकमेल करण्यात आले. आरोपीने अनेकदा तिचे लैंगिक शोषण केले आणि तिच्याकडून सुमारे चार लाख रुपयेही वसूल केले. महिलेने आरोप केला की, तिच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात आला आणि धार्मिक विधींच्या नावाखाली अनेक गोष्टी करून घेण्यात आल्या.
महिलेचा दावा आहे की, 31 मे रोजी अयाज तिला जबरदस्तीने नागपूरजवळील कळमेश्वर येथे घेऊन गेला. तिथे तिची भेट अमीन शेख आणि हजरत मौलाना यांच्याशी करून देण्यात आली. मौलाना मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील तामिया गावाचा रहिवासी आहे. पीडीतेचा नवरा कामावरून घरी परत आला, तेव्हा तिने त्याला घडलेली घटना सांगितली. त्यानंतर सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीची इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली असून फॉरेन्सिक तपास सुरू केला आहे.




