भुसावळ शहर ठाण्यात महेश गायकवाड तर तालुका ठाण्याचे निलेश गायकवाड प्रभारी निरीक्षक
पदभार स्वीकारला : कायदा-सुव्यवस्थेला प्राधान्य ; जनतेच्या तक्रारी सोडवण्याची ग्वाही
Mahesh Gaikwad is the In-charge Inspector of Bhusawal City Police Station, while Nilesh Gaikwad holds the same position at the Taluka Police Station भुसावळ (16 जून 2026) : जळगाव जिल्ह्यातील 15 पोलीस निरीक्षकांच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सोमवारी रात्री बदल्या केल्या. त्यात भुसावळ शहर ठाण्यातील रिक्त जागेवर भुसावळ तालुक्याचे निरीक्षक महेश गायकवाड तर भुसावळ तालुक्याच्या निरीक्षकपदी एरंडोल निरीक्षक निलेश गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. मंगळवारी सायंकाळी महेश गायकवाड यांनी शहर ठाण्याची सूत्रे स्वीकारली.
शहर ठाण्यात महेश गायकवाड रूजू
भुसावळ शहर ठाण्याचे निरीक्षक उद्धव डमाळे यांची अहिल्यानगर जिल्ह्यात बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर भुसावळ तालुक्याचे महेश गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर मंगळवारी सायंकाळी त्यांनी प्रभारी अधिकारी व एपीआय राहुल भंडारी यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली.
कायदा-सुव्यवस्थेला प्राधान्य
यावेळी नूतन निरीक्षकांचे सहकारी कर्मचार्यांतर्फे स्वागत करण्यात आले. नूतन निरीक्षक गायकवाड म्हणाले की, कायदा-सुव्यवस्थेला प्रथम प्राधान्य असून नागरिकांच्या तक्रारींचे निश्चितपणे निरसन केले जाईल, असेही ते म्हणाले.
भुसावळ तालुका निरीक्षक उद्या घेणार पदभार
भुसावळ तालुक्याचे नूतन निरीक्षक निलेश गायकवाड हे बुधवारी आपल्या पदाचा पदभार घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.




