अमळनेरात जुन्या वादातून दोन गटात राडा : 11 जणांविरोधात गुन्हा


Clash between two groups in Amalner over an old dispute; case registered against 11 individuals अमळनेर (17 जून 2026) : जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात तुफान राडा झाला व चाकू, लोखंडी सळई , फायटर काठ्यांनी झालेल्या मारहाणीत दोन्ही गटातील सात जण जखमी झाले. तुंबळ हाणामारीची घटना 13 रोजी रात्री साडे नऊ वाजता घडली. दोन्ही गटातील 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले अमळनेरात ?
खवशी येथील सीमा अशोक पवार यांनी फिर्याद दिली की, त्यांचा पुतण्या प्रतीक जगताराव पवार याच्याशी 13 जून रोजी गुरांना पाणी पाजण्यासाठी सार्वजनिक हाळवर गेला असता त्याच्याशी दर्शन भूषण गोसावी, भूषण सुरेश गोसावी, दीपक उर्फ कांतीलाल सुरेश गोसावी यांनी मागील भांडणाच्या कारणावरून शिविगाळ व दमदाटी केली. गावातील लोकांनी तो वाद मिटवला. रात्री साडे नऊ वाजता ते घराबाहेर ओट्यावर बसलेले असताना दीपक, भूषण, दर्शन, कल्याणी कांतीलाल गोसावी, रुपाली भूषण गोसावी आणि त्यांच्यासोबत खेडी, नांद्री, अमळगाव, अमळनेर, गांधली येथील 20-25 लोक आले व त्यांनी जातीवाचक अश्लील शिवीगाळ सुरू केली. जेठाणी सुलभा दिनकरराव पवार व शालुबाई जगतराव पवार या समजावण्याचा प्रयत्न करीत असताना भूषण याने हातातील चाकूने सुलभा हिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खाली पाडले. दीपक गोसावी यानी शालुबाई हिला चाकूने डाव्या हाताच्या बोटावर वार केला तर दर्शन याने त्याच्या हातातल्या चाकूने सीमा पवार हिच्या तळहातावर चाकूने वार केला.

चाकू तळव्यातून अ-पार गेल्याने आरडाओरडा झाल्याने तिचे जेठ जगतराव मधुकर पवार, दिनकर मधुकर पवार आणि पुतण्या प्रतीक पवार भांडण सोडवायला आले. अनोळखी लोकांनी पुतण्याला धरून ठेवले आणि कोणीतरी छातीवर फायटर मारले आणि काठ्यांनी मारहाण केली. गावातल्या लोकांनी भांडण आवरले. जखमींना नर्मदा मेडिकल फौंडेशन मध्ये दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी दवाखान्यात जबाब घेतल्यानंतर गोसावी परिवारातल्या पाच जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास डीवायएसपी विनायक कोते करीत आहेत.

दुसर्‍या गटाचीही तक्रार
दुसर्‍या गटातर्फे दर्शन भूषण गोसावी याने फिर्याद दिली की, त्याचे वडील भूषण, काका दीपक हे प्रतिकच्या घरी जाऊन त्याच्या वडिलांना प्रतिकने शिवीगाळ केली असे समजावून सांगत असताना शालू जगतराव पवार, सीमा अशोक पवार या दोघांनी भूषणची गच्ची धरली आणि दर्शनला खाली पाडले. जगतराव मधुकर पवार यांनी भूषण याला लाकडाने पाठीवर आणि मानेवर मारले. प्रतीकने दर्शनच्या डोक्यावर वीट मारली. राज अनिल शिरसाठ याने दर्शनच्या डोक्यात लोखंडी सळईने मारहाण केल्याने डोक्यातून रक्त निघाले.

दगडू नाना शिरसाठ यांनी लोखंडी सळईने पाठीवर आणि पायावर मारहाण केली. त्यावेळी काका दीपक गोसावी आवरायला आले असता त्या दोघांनी त्यांनाही मारहाण करून जखमी केले. गावातल्या लोकांनी भांडण आवरले. तेव्हादेखील त्यांनी तुमचा काटा काढून टाकू जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. दर्शनने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून प्रतीक , जगतराव , राज शिरसाठ ,दगडू शिरसाठ, शालुबाई , सीमा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल विजय भोई करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !