भुसावळातील 30 हजारांचे लाच प्रकरण : पसार लेखा परीक्षकही जळगाव एसीबीच्या जाळ्यात
Bhusawal ₹30,000 bribery Case : Absconding auditor also falls into Jalgaon ACB’s net भुसावळ (18 जून 2026) : सावकारीचे लायसन्स मिळवून देण्यासाठी तडजोडीअंती 30 हजारांची लाच स्वीकारताना भुसावळातील सहकारी संस्था कार्यालयातील दोन लेखा परीक्षकांना जळगाव एसीबीने सोमनाथ
दुपारी भुसावळातील नाहाटा महाविद्यालयाजवळील चौफुलीवर अटक केली होती तर सहकार अधिकारी मात्र सापळ्याची कुणकुण लागताच पसार झाला होता. एसीबीने धुळ्यातील सहकार्यांशी संवाद साधल्यानंतर या संशयीतालाही बेड्या ठोकण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या संशयीतांवर कारवाई
प्रमाणित लेखापरीक्षक सुरेश जनार्दन विसपुते (62, माऊली नगर, रेणुका माता मंदिराजवळ, राजस्थान मार्बलमागे, भुसावळ) व प्रमाणित लेखापरीक्षक हेमंत प्रकाश काळे (40, विवेकानंद नगर, जिल्हापेठ जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून गुरुवार, 18 रोजी त्यांना भुसावळ न्यायालयता हजर केले जाणार आहे.


असे आहे लाच प्रकरण
भुसावळातील एका तक्रारदाराला सावकारीचे लायसन्स हवे असल्याने त्यांनी संंबंधित कार्यालयाशी संपर्क साधला असता संशयीतांनी 30 हजारांची लाच मागितली मात्र तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी जळगाव एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर सोमवार, 15 रोजी सापळा रचण्यात आला. दोघा प्रमाणित लेखा परीक्षक लाचेची रक्कम घेण्यासाठी भुसावळच्या नाहाटा चौफुलीवर सोमवारी दुपारी चार वाजता पोहोचले मात्र लाच स्वीकारताच दबा धरून असलेल्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले तर सापळ्याची कुणकुण लागताच अधिकारी विजय गरूड पसार झाला व नंतर त्यास याच दिवशी धुळ्यातील पथकाने बेड्या ठोकल्या. जळगाव एसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत नागरे व पोलीस निरीक्षक रेशमा अवतारे आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला होता.

