सात हजारांची लाच भोवली : पोलीस हवालदारासह तिघे कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

श्रींगोदा पोलीस ठाण्यातील प्रकरणात मदतीसाठी लाच मागणे कर्मचार्‍यांचे अंगलट


Bribe of ₹7,000 proves costly: Police constable and three other employees land in ACB’s net. अहिल्यानगर (19 जून 2026) : अपघात प्रकरणात मदत करण्यासाठी आणि पुढील कायदेशीर प्रक्रियेमध्ये सहकार्य करण्याच्या मोबदल्यात सात हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील हवालदार व अन्य दोन कॉन्स्टेबल यांना अहिल्यानगर एसीबीने अटक केली आहे. या कारवाईने पोलीस वर्तुळातील लाचखोर कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे,

या कर्मचार्‍यांना अटक
हवालदार नितीन अशोक गाडगे (44, पंतनगर, कम्युनिटी हॉलजवळ, श्रीगोंदा), कॉन्स्टेबल राजेश रावसाहेब जाधव (38, अवधूत नगर, श्रींगोदा), कॉन्स्टेबल तथा चालक दादाराम शिवराम म्हस्के (56ख चांदगाव, ता.श्रीगोंदा) यांचा समावेश आहे.



असे आहे प्रकरण
तक्रारदार यांच्या भावाचा 1 जून 2026 रोजी अपघात झाला होता. त्यांना उपचारासाठी पाटील हॉस्पीटल, दौंड येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दौंड पोलिसांनी अपघाताची माहिती घेवून अपघात प्रकरण तपासासाठी श्रीगोंदा पोलिसात पाठवले होते. तक्रारदाराने श्रीगोंदा पोलीस स्टेशनला आल्यानंतर नितीन गाडगे यांची भेट घेतली व गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर अपघात प्रकरणाची कार्यवाही करण्यासाठी व मदत करण्याच्या अनुषंगाने राजेश जाधव यांची भेट घेण्यास सांगितले व गुन्हा दाखल करण्यासाठी तसेच आयरेड अ‍ॅप्लीकेशनमध्ये माहिती भरण्यासाठी 10 हजारांची लाच मागण्यात आली व 14 रोजी या संदर्भात तक्रार नोंदवण्यात आली व 16 रोजी पडताळणी दरम्यान लाच मागणी सिद्ध झाली व सापळा रचण्यात आला.

वरील दोन्ही आरोपींनी चालक दादाराम म्हस्के यांची भेट घेण्यास सांगितल्यानंतर त्यांनी लाच रक्कम स्वीकारताच नितीन घाडगे व राजेश जाधव यांनाही अटक करण्यात आली. तिघांविरुद्ध श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा अहिल्यानगर एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपूटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू आल्हाट, नाईक चंद्रकांत काळे, कॉन्स्टेबल किशोर कुळधर, कॉन्स्टेबल शेखर वाघ, चालक दशरथ लाड आदींच्या पथकाने यशस्वी केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !