धुळे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; गावठी पिस्तुलासह शिरपूर तालुक्यातील संशयीत जाळ्यात


Dhule Local Crime Branch Action: Suspect from Shirpur Taluka Nabbed with Country-made Pistol धुळे (19 जून 2026) : जिल्ह्यात अवैध शस्त्रांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करीत शिरपूर तालुक्यातील तरुणास गावठी पिस्तूल व जिवंत काडतूसासह ताब्यात घेतले आहे. या कारवाईत सुमारे 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना संशयीताकडे शस्त्र असल्याची माहिती मिळाली होती व त्यांनी पथकाला निर्देश दिल्यानंतर कारवाई करण्यात आली. सोनगीर उड्डाणपुलाजवळील बोगद्याजवळ संशयीत मुकेश परशराम पावरा (21, रा. सुभानपाडा, बोरपाणी, ता.शिरपूर, जि. धुळे) आल्यानंतर पथकाने त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळल्याने ते जप्त करण्यात आले. पोलिसांनी आरोपीकडून सुमारे 40 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व एक हजार रुपये किंमतीचे जिवंत काडतूस जप्त करीत सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.




यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे, आरीफ पठाण, राहुल सानप, देवेंद्र ठाकूर, संजय सुरसे आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !