स्वतःला देवाचा अवतार सांगत भोंदूने केले महिलेचे 15 वर्ष लैंगिक शोषण : मूत्रही पाजले !


Fraudster claiming to be a divine incarnation sexually exploited a woman 15 times ; even forced her to drink urine! पुणे (20 जून 2026) : राज्यात भोंदू बाबांचा सुळसुळाट वाढला असून त्यातून आता अत्याचाराची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. पुण्यातही धक्कादायक बातमी समोर आली आहे. भोंदूने आपण देवाचा अवतार असल्याचे सांगत पीडीत महिलेवर 15 वर्षांपर्यंत महिलेवर बलात्कार केला तसेच पीडीतेच्या तक्रारीनुसार तिला पमूत्र प्राशन करण्यास सांगितले. राधामोहन मिश्रा (59, हरियाणा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली.

काय आहे नेमके प्रकरण ?
पुण्यातील एका बंगल्यात आरोपी राधामोहन मिश्रा आश्रम चालवत होता व तो लोकांना कुटुंब, आरोग्य आणि आर्थिक समस्या दूर करण्याचे आमिष दाखवून आपल्या प्रभावाखाली आणत असे. याच प्रकारे त्याने हरियाणातील 41 वर्षीय महिला आणि तिच्या कुटुंबाचा विश्वास जिंकला.




मूत्रही पाजले, 15 वर्ष बलात्कार
पीडितेचा आरोप आहे की, बाबा स्वतःला दिव्य शक्ती असलेला सांगून अनेक वर्षे तिच्यावर बलात्कार करत राहिला. महिलेने सांगितले की, तिला अनेकदा विजेचे धक्के देण्यात आले, लघवी पिण्यास भाग पाडले गेले आणि तिला सतत मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागला.

मुख्य आरोपीसह आठ संशयीतांना अटक
पोलिसांनी सांगितले की, आरोपीने महिलेला तिच्या कुटुंबापासून वेगळे केले होते. त्याने कुटुंबाला महिलेबद्दल चुकीच्या गोष्टी सांगितल्या आणि तिच्यावर पतीपासून वेगळे होण्यासाठी दबाव आणला. बाबा महिलेची मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेण्याच्या आणि त्यावर कब्जा करण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी मिश्रासह आठ जणांना अटक करून सर्वांना 20 जूनपर्यंत ताब्यात घेतले आहे.

महिलेने हिंमत दाखवून केली तक्रार
पोलिसांनुसार, महिला आश्रमातच राहत होती. तिच्या खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते आणि प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात होते. आरोपीने महिला आणि तिच्या पतीचे खाजगी व्हिडिओ मिळवले होते, ज्यांचा वापर ब्लॅकमेल करण्यासाठी केला जात होता. सततच्या छळाला कंटाळलेल्या महिलेने शेवटी हिंमत दाखवली आणि आश्रमात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडून तिथून पळ काढला. घरी पोहोचल्यावर तिने कुटुंबाला आपली संपूर्ण आपबिती सांगितली. यानंतर कुटुंबाने पोलिसांशी संपर्क साधला आणि हे प्रकरण समोर आले.

’आधुनिक गुरुकुल’च्या नावाखाली लोकांना फसवतो
पोलिसांच्या तपासात समोर आले आहे की, आरोपी ’आधुनिक गुरुकुल’ चालवण्याचा दावा करत होता. तो लोकांना विश्वास देत होता की, त्याच्याकडे अलौकिक शक्ती आहेत आणि तो भविष्य सांगू शकतो.तो मुलांना आश्रमात ठेवण्यासाठी कुटुंबांना तयार करत होता. पोलिसांना अशी भीती आहे की, तेथे राहणार्‍या मुलांचे आणि इतर लोकांचेही मानसिक किंवा शारीरिक शोषण झाले असावे.

आश्रमातून रोख रक्कम जप्त
पोलिसांनी आश्रमावर छापा टाकून 12 लॅपटॉप, 19 हार्ड डिस्क, एक टॅबलेट, 11 मोबाईल फोन, 23 पेन ड्राइव्ह, अनेक ऊतऊ-उऊ, सुमारे 6.5 लाख रुपये रोख रक्कम आणि अंदाजे 15 लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत. काही औषधेही मिळाली आहेत, ज्यांची तपासणी केली जात आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !