किनगावातील तरुणाने यावल शहरात उचलले धक्कादायक पाऊल
Youth from Kingaon takes shocking step in Yaval city यावल (20 जून 2026) : यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील रहिवाशी असलेल्या 20 वर्षीय तरुणाने यावल शहरातील आठवडे बाजारभागातील सईदपुरा येथे काकाच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शेख जयैद शेख अख्तर (20) असे मृताचे नाव आहे.
काय घडले यावल शहरात ?
शेख जयैद याने गळफास घेतल्यानंतर त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. किनगाव बुद्रुक, ता.यावल येथील रहिवाशी शेख जयैद शेख अख्तर (20) हा तरुण शुक्रवारी यावल शहरातील आठवडे बाजार भागातील सईदपुरा येथे त्याचे काका शेख हारुण शेख रशीद यांच्या घरी आला असता त्याने त्याच्या आजीला चहा बनवण्याचे सांगितले आणि तो घराच्या वरच्या मजल्यावर गेला. बराच वेळ झाला तरी तो चहा पिण्यासाठी खाली न आल्याने या तरुणाला बोलवण्यासाठी त्याची आजी वरच्या मजल्यावर गेली असता त्याने वरील मजल्यावर गळफास घेतल्याचे त्यांना निदर्शनास आले.



तातडीने त्यांनी त्याला कुटुंबियाच्या मदतीने तेथून काढून यावल ग्रामीण रुग्णालयात आणले असता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पासपोळे करीत आहे.

