नंदुरबार शहरात लॅपटॉप खरेदीसाठी आणलेले पैसे लुटले !

बसस्थानक परिसरात दोन युवकांना चाकूचा धाक दाखवत मारहाण


Money brought for purchasing a laptop looted in Nandurbar City ! नंदुरबार (20 जून 2026) : पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने डहाणू तालुक्यातून आलेल्या दोन युवकांना चाकूचा धाक दाखवत मारहाण करून 70 हजार रुपयांचा ऐवज लूटण्यात आला. ही धक्कादायक घटना शहरातील बसस्थानक परिसरात घडली. या प्रकरणी चार अनोळखींविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले शहरात ?
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील खरखडा येथील यश संजय चव्हाण (18) व त्यांचा नातेवाईक लॅपटॉप खरेदीसाठी रोकड घेऊन नंदुरबार येथे आले होते. बसस्थानक परिसरातून जात असताना चार अज्ञातांनी त्यांना अडवून शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर चाकूचा धाक दाखवत 50 हजारांची रोकड व 20 हजारांचा मोबाईल असा एकूण 70 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात चार अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे दोघे तरुण पैसे डबल करण्याच्या आमिषाने शहरात आल्यानंतर हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !