गुजरातमधून चोरली नऊ लाखांची महागडी ‘किया’ : जळगावात माहिती कळताच एमआयडीसी पोलिसांनी आवळल्या चालकाच्या मुसक्या


High-end ‘Kia’ worth ₹9 lakh stolen from Gujarat : MIDC police nab driver in Jalgaon upon receiving information. जळगाव (20 जून 2026) : गुजरात राज्यातील अहमदाबाद ग्रामीण परिसरातून चोरट्यांनी महागडी नऊ लाखांची किया कार लांबवल्यानंतर या कारने नशिराबाद टोल नाका क्रॉस केल्यानंतर पोलीस यंत्रणेला मेसेज मिळताच जळगाव एमआयडीसी पोलिसांना सूचित करण्यात आले. सतर्क यंत्रणेने नाकाबंदी करीत अजिंठा चौफुली परिसरात पाठलाग करीत वाहन अडवले व चालकाला ताब्यात घेतले. पोलिसांनी वाहनासह चालकाला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी अहमदाबाद ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

काय आहे प्रकरण ?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोपल पोलीस स्टेशन, अहमदाबाद ग्रामीण (गुजरात) येथे 15 एप्रिल 2026 रोजी किया कॅरेन्स मोटार कार (क्रमांक एम.पी.04 झेड.एल. 5155) चोरीस गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना संबंधित चोरीची कार गुरुवार, 18 रोजी नशिराबाद टोल नाका क्रॉस करून जळगावच्या दिशेने येत असल्याची गोपनीय माहिती तपासाधिकार्‍यांना मिळाली व त्यानंतर जळगाव पोलिसांना सूचित करण्यात आले.




काशीनाथ चौकात नाकाबंदी
एमआयडीसी पोलीस ठाण्यातील हवालदार संदीप सपकाळे, हवालदार रमेश अहिरे, हवालदार अफजल बागवान यांनी 18 जून 2026 रोजी सायंकाळी काशीनाथ चौक परिसरात नाकाबंदी केल्यानंतर संशयीत वाहन दिसताच पोलिसांनी ते थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र चालकाने पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगाने वाहन पळविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून अजिंठा चौफुली परिसरातील हिरो होंडा शोरूमसमोर संबंधित वाहन अडवत चालकाला ताब्यात घेतले. पोलिसांनी वाहनासह चालकाला ताब्यात घेत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणले व बोपल पोलिसांना माहिती कळवण्यात आल्यानंतर संबंधित यंत्रणेचे अधिकारी आल्यानंतर त्यांना संशयीत चालक व वाहन सुपूर्द करण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वात हवालदार संदीप सपकाळे, कॉन्स्टेबल रमेश अहिरे, कॉन्स्टेबल अफजल बागवान आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !