धुळे जिल्हा पोलिस दलात मोठे फेरबदल : 18 पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या

पाच पोलीस निरीक्षकांसह अन्य 13 सहाय्यक निरीक्षकांची प्रशासकीय कारणाने बदली


गणेश वाघ
Major reshuffle in Dhule District Police Force: 18 police officers transferred. भुसावळ (21 जून 2026) : धुळे जिल्हा पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर अंतर्गत फेरबदल करण्यात आले असून प्रशासकीय कारणास्तव तब्बल 18 पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या नूतन जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी शनिवारी रात्री उशिरा केल्या आहेत. बदल्या झालेल्यांमध्ये पाच पोलिस निरीक्षक व अन्य सात सहाय्यक निरीक्षकांचा समावेश आहे. प्रशासनिक कारणे, रिक्त पदे तसेच नव्याने हजर झालेल्या अधिकार्‍यांच्या नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

आस्थापना मंडळाच्या बैठकीत निर्णय
जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार विविध पोलिस ठाणे, नियंत्रण कक्ष आणि शाखांमधील अधिकार्‍यांच्या जबाबदार्‍यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यामध्ये काही अधिकार्‍यांना नवीन पदस्थापना देण्यात आली असून काही रिक्त पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.




पाच निरीक्षकांच्या अशा झाल्या बदल्या
आझादनगरचे निरीक्षक निवृत्ती गंगाराम पवार यांची नियंत्रण कक्षात तर जिविशाचे विनोद उत्तमराव पाटील यांची आझादनगर ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी बदली करण्यात आली. चाळीसगाव रोड प्रभारी सुरेशकुमार ताराचंद घुसर यांची तसेच शिरपूर तालुक्याचे जयपाल माणिकरा हिरे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. नियंत्रण कक्षातील संतोषकुमार साहेबराव भामरे यांची धुळे शहर प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली.

सात सहाय्यक निरीक्षकांच्याही बदल्या
निजामपूर प्रभारी मयूर साहेबराव भामरे यांची शिंदखेडा ठाण्यात तर नरडाण्याचे सहाय्यक निरीक्षक निलेश रमेशसिंग मोरे यांची शिरपूर तालुका ठाण्यात नियुक्ती करण्यात आली. पिंपळनेर प्रभारी किरण सुरेशराव बर्वे यांची निजामपूर प्रभारी तर धुळे तालुक्याचे विवेक अशोकराव पवार यांची चाळीसगाव रोड ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली. पश्चिम देवपूर ठाण्याचे प्रभारी सचिन अरुण कापडणीस यांची नरडाणा प्रभारी तर स्थानिक गुन्हे शाखेचे नामदेव मावंजी सहारे यांची पिंपळनेर ठाण्यात प्रभारी म्हणून तसेच नियंत्रण कक्षातील जिभाऊ तुकाराम पाटील यांची पश्चिम देवपूर ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली.

सहा सहाय्यक निरीक्षकांची नव्याने तात्पुरता पदस्थापना
टीमसीच्या सहा.निरीक्षक मीना हमजान तडवी यांची भरोसा सेल तर निजामपूरच्या प्रियदर्शनी पांडुरंग थोरात यांची साक्री येथे बदली करण्यात आली. नियंत्रण कक्षाच्या वर्षा सारंग पाटील यांची शिरपूर शहर तर नियंत्रण कक्षातील रितेश नाना राऊत यांची देवपूर ठाण्यात नियुक्ती करण्यात आली. नियंत्रण कक्षातील रवीकुमार राजेंद्र पवार यांची धुळे तालुका तर दोंडाईचातील दीपक प्रकाश ढोके यांची स्थानिक गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली.

प्रशासनिक कार्यक्षमतेसाठी निर्णय
पोलिस अधीक्षक विशाल आनंद (भा.पो.से.) यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या आदेशानुसार सर्व संबंधित अधिकार्‍यांनी आपल्या नव्या पदस्थापनेच्या ठिकाणी तत्काळ हजर राहून अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या फेरबदलांमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !