खासदारांच्या बंडानंतर मोठी राजकीय घडामोड : खासदार ओमराजे निंबाळकरांची मनधरणी ; पाच खासदारांचे गणित बिघडणार !


Major political development following the MPs’ rebellion: Efforts to pacify MP Omraje Nimbalkar; the arithmetic involving five MPs set to be disrupted! मुंबई (21 जून 2026) : ठाकरेंच्या गटातील सहा खासदारांनी बंड केल्यानंतर आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. बंडखोर खासदारांपैकी पाच खासदार दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये असतानाच धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर मात्र पुण्यात असून त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर करणार असल्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान, ठाकरे गटाने पडद्याआडून त्यांची मनधरणी केली असल्याची माहिती असून त्यामुळे पाच खासदारांचा गट अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गुप्तपणे भेट घेतल्याची चर्चा
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी ओमराजे यांच्यावर जाहीर टीका केली असली, तरी पडद्यामागे मात्र त्यांची मनधरणी करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते वरुण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील हे मध्यरात्री अत्यंत गुप्तपणे ओमराजे निंबाळकर यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेटीसाठी पोहोचले.




राजकीय विश्लेषकांच्या मते, ठाकरे गटाची ही रणनीती अत्यंत महत्त्वाची आहे जर ओमराजे निंबाळकर यांचे बंड शांत करण्यात ठाकरे गटाला यश आले तर दिल्लीत असलेल्या उर्वरित पाच बंडखोर खासदारांचे गणित बिघडू शकते आणि त्यांचा गट धोक्यात येऊ शकतो. म्हणूनच ठाकरे गटाकडून ओमराजेंना थांबवण्यासाठी संपूर्ण ताकद लावली जात आहे.

ओमराजे आमच्या पक्षाचे खासदार
भेटीनंतर माध्यमांशी बोलताना वरुण सरदेसाई म्हणाले की, पवनराजे हत्या प्रकरणाचा निकाल ओमदादांच्या अपेक्षेप्रमाणे लागलेला नाही त्यामुळे खचलेल्या निंबाळकर परिवाराची विचारपूस करण्यासाठी पक्षाच्या वतीने आम्ही आलो होतो. ओमदादा हे आमच्या पक्षाकडून एकदा आमदार आणि तीनदा खासदार झाले आहेत. आजही ते ’शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले खासदार आहेत. आमच्यात अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली मात्र प्रत्येक गोष्ट माध्यमांसमोर सांगण्याची गरज नसते.

गुपचूप भेटीवर शिंदे गटाची टीका
वरुण सरदेसाई आणि कैलास पाटील यांच्या या मध्यरात्रीच्या गुप्त भेटीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण साळी यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. ठाकरे गटाच्या या दुटप्पी भूमिकेवर टीका करताना किरण साळी म्हणाले, रात्रीच्या अंधारात गाड्या बदलून, कपडे बदलून आणि तोंड झाकून वरुण सरदेसाई आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी आले आहेत. यावरूनच त्यांची हतबलता दिसून येते. एकीकडे त्यांचे प्रवक्ते संजय राऊत जाहीरपणे या खासदारांना गद्दार, खोके आणि अश्लील घाणेरड्या शिव्या देतात तर दुसरीकडे वरुण सरदेसाई आणि त्यांचे सहकारी मध्यरात्री गुपचूप येऊन त्याच खासदारांच्या पाया पडतात! यांची वैचारिक पातळी किती खाली घसरली आहे बघा.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !