धुळे जिल्हा पोलिस दलातील 12 उपनिरीक्षकांच्या बदल्या

नव्याने हजर तीन अधिकार्‍यांनाही मिळाली नियुक्ती : एका अधिकार्‍याची विनंती बदली


धुळे (21 जून 2026) : धुळे जिल्हा पोलिस दलातील निरीक्षकांसह सहाय्यक निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्यानंतर 12 पोलीस उपनिरीक्षकांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात नव्याने दाखल तीन अधिकार्‍यांनाही पोलीस ठाण्यात पोस्टींग मिळाली आहे. नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी बदल्याबाबत आदेश शनिवार, 20 रोजी रात्री उशिरा काढले आहेत.

तातडीने बदलीस्थळी हजर होण्याचे निर्देश
बदल्या झालेल्या अधिकार्‍यांमध्ये शिरपूर शहर, धुळे शहर, धुळे तालुका, निजामपूर, पिंपळनेर, शिंदखेडा, साक्री, महाडींगर आणि आदावदनगर या महत्त्वाच्या ठिकाणावरील उपनिरीक्षकांचा समावेश आहे. काही अधिकार्‍यांची प्रशासकीय कारणास्तव तर काहींची नव्याने हजर झाल्यानंतर नियुक्ती करण्यात आली असून अधिकार्‍यांनी तातडीने पोलीस ठाण्यात रूजू व्हावे, असे आदेशात नमूद आहे.




या पोलीस उपनिरीक्षकांच्या झाल्या बदल्या
शिरपूर शहरचे सुरेश भीमराव सोनवणे यांची सोनगीरला तर आझादनगरचे समाधान अशोक सुरवाडे यांची धुळे तालुका ठाण्यात नियुक्ती करण्यात आली. पिंपळनेरचे भूषण गोकुळ शेवाळे यांची निजामपूर ठाण्यात तर साक्रीचे प्रसाद दिलीप रौंदळ यांची पिंपळनेर ठाण्यात नियुक्ती करण्यात आली. शिरपूर शहरचे हेमंत केशवराव खैरनार यांची शिरपूर तालुका येथे तर शहर वाहतूक शाखेचे सुनील दत्तात्रय इमलवार यांची धुळे शहर येथे नियुक्ती करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेचे अमोल देविदास देवरे यांची मोहाडीनगर येथे तर आर्थिक गुन्हे शाखेचे सविता श्रवण गवांदे यांची आझादनगर ठाण्यात नियुक्ती करण्यात आली. धुळे शहर वाचक निकिता हरिश्चंद्र पाटील यांची नियंक्षण कक्षात बदली करण्यात आली तर नव्याने जिल्ह्यात हजर झालेल्या नियंत्रण कक्षातील माया नारायणसिंग राजपूत यांना शिंदखेडा, जितेंद्र सुरेश महाजन यांना शिरपूर शहर तर भूषण उखा पाटील यांना साक्री ठाण्यात नियुक्ती देण्यात आली.

कायदा-सुव्यवस्था राखण्यास होणार मदत
सर्व संबंधित अधिकार्‍यांनी आपल्या नवीन नियुक्तीच्या ठिकाणी तत्काळ रुजू होऊन अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून बदल्यांमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी राहण्यास मदत होणार असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !