फाफोरे येथील एकाने मद्याच्या नशेत केली आत्महत्या


अमळनेर (21 जून 2026) : अमळनेर तालुक्यातील फापोरे खुर्द येथील एकाने मद्याच्या नशेत विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना 22 मे रोजी सकाळी आठ वाजता घडली. पंकज मोतीलाल पाटील असे मृताचे नाव आहे.

उपचारादरम्यान मृत्यू
कैलास पाटील यांना त्यांच्या भावाच्या पत्नीने फोन करून सांगितले की, तुमचा मावस भाऊ पंकजने दारूच्या नशेत विष घेतले आहे. संबधिताला तातडीने ग्रामीण रुग्णालयात आणून प्राथमिक उपचार करण्यात आले व तेथून धुळे येथील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. 30 मे रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉ.यश इतेकर यांनी जाहीर केले. अमळनेर पोलिसात कैलास पाटील यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हेड कॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !