जळगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार : नराधमाला बेड्या


जळगाव (22 जून 2026) :  जळगाव तालुक्यातील एका गावातील 15 वर्षीय अल्पवयीन बालिकेला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली आहे.

काय आहे प्रकरण ?
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 7 एप्रिल 2026 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील एका गावातील घडली. पीडीता घरात एकटीच असताना त्या गावातीलच 35 वर्षीय आरोपी दीपक प्रकाश निकम याने घराच्या मागच्या दाराने आत प्रवेश केला. मुलगी स्वयंपाकघरात काम करत असताना आरोपीने तिला जीवे ठार मारण्याची धमकी देत अत्याचार केला. यानंतरही आरोपीने पुन्हा एकदा तिच्यासोबत असाच संतापजनक प्रकार केला.

या छळाला कंटाळून अखेर पीडितेने एमआयडीसी पोलिसात तक्रार दिल्यानंतर 21 जून 2026 रोजी आरोपी दीपक प्रकाश निकमला अटक करीत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक बबन आव्हाड आणि एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत नराधम आरोपी दीपक निकम याला बेड्या ठोकल्या आहेत. तपास महिला पोलीस उपनिरीक्षक राजश्री पाटील करत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !