अमळनेर शहरात धाडसी घरफोडी : नऊ लाखांचे सोने लांबवले


Daring burglary in Amalner city: Gold worth nine lakhs stolen. अमळनेर (22 जून 2026) : घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी चक्क तिसर्‍या मजल्यावर जात घरफोडी केली. तब्बल आठ लाख 66 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास झाल्याचा प्रकार 21 रोजी सकाळी उघडकीस आला. अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडले अमळनेर शहरात
छगन चुडामण बिर्‍हाडे (एकता नगर, जिनगर गल्ली) यांनी फिर्याद दिल्यानुसार पुतण्याचा साखरपुडा असल्याने ते घराला कुलूप लावून 20 रोजी रात्री साडे दहा वाजता सुरतला गेले. 21 रोजी सकाळी आठ वाजता मंगलाबाई रातीलाल बिर्‍हाडे यांनी फोन करून सांगितले की, तुमच्या दुसर्‍या मजल्यावरचे आणि तिसर्‍या मजल्यावरचे घराचे कुलूप तुटलेले दिसत आहे. दरवाजे उघडे आहेत. घरात चोरी झाल्याचे समजताच छगन बिर्‍हाडे दुपारी अडीच वाजेपर्यंत अमळनेरात पोहचले. खालच्या मजल्यावर कुलूप जसेच्या तसे होते. ते उघडून आत प्रवेश केला असता दुसर्‍या आणि तिसर्‍या मजल्यावर ठेवलेले कापटाचे लॉक तोडलेले दिसून आले आणि त्यातील दागिने लंपास झालेले दिसले.

लाखोंचे दागिने लांबवले
चोरट्यांनी घरातील 4800 रुपयांची अर्धा ग्राम वजनाची लहान बाळाची सोन्याची रिंग, तीन लाख 60 हजार 788 रुपयांची 25.18 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, 73 हजार 997 रुपयांची 5.07 ग्राम वजनाचे सोन्याची पोत पेंडल, एक लाख 33 हजार 252 रुपयांची 9.34 ग्राम सोन्याची पोत, 21 हजार 455 रुपयांचे 1.47 ग्राम वजनाच्या सोन्याच्या मंगळसूत्र वाट्या, 41 हजार 304 रुपयांचे 2.83 ग्राम वजनाच्या कानातल्या बाळ्या, दोन लाख 30 हजार 472 रुपये किंमतीच्या 35 ग्रॅम वजनाचा चपला हार असा एकूण आठ लाख 66 हजार 68 रुपयांचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबवले.

अधिकार्‍यांची धाव
घटनास्थळी डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, निलेश मोरे, शेखर साळुंखे, विनोद संदानशिव, गणेश पाटील, उज्वल पाटील, नितीन मनोरे यांनी भेट दिली. जळगाव स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक, श्वान पथक, ठसे तज्ञ यांनी भेटी दिल्या. कपाटावर चोरट्यांचे ठसे मिळून आले आहेत. तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !