चोपडा तालुक्यातील अल्पवयीनावर अत्याचार


Sexual assault on a minor in Chopda Taluka चोपडा (22 जून 2026) : चोपडा तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमसंबंधाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आला. पीडीतेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
चोपडा तालुक्यातील एका गावातील 40 वर्षीय महिलेच्या 16 वर्ष सात महिने वय असलेल्या अल्पवयीन मुलीसोबत गावातीलच 23 वर्षीय संशयित युवक गणेश एकनाथ भिल्ल याने प्रेमसंबंध जोडले होते. सप्टेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीत पीडिता घरी एकटीच असल्याचा गैरफायदा घेऊन संशयित गणेश भिल्लने तिच्यावर पाच ते सहा वेळा बळजबरीने शारीरिक अत्याचार केला.

हा प्रकार समोर आल्यानंतर पीडितेच्या आईने 21 जून 2026 रोजी रात्री 10.36 वाजता चोपडा शहर पोलिसात तक्रार दिल्यावरून आरोपी गणेश एकनाथ भिल्ल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढील तपास चोपडा शहर निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एकनाथ भिसे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !