धुळे गुन्हे शाखेची मोठी कारवाई : 51 हजारांचा गुंगीकारक औषधांचा साठा जप्त
Major operation by Dhule Crime Branch: Stock of narcotic drugs worth ₹51,000 seized. धुळे (23 जून 2026) : गुंगीकारक औषधांच्या बेकायदेशीर वाहतुकीविरोधात धुळे स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत तब्बल 51 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. एजाज रफिक शेख (25, अंजना टेनामेंट, सलाबादपुरा, सुरत, गुजरात) असी अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणार्या गुंगीकारक कफ सिरपच्या बाटल्या विक्रीच्या उद्देशाने धुळेमार्गे आणल्या जात असल्याची माहिती मिळाली होती. एलसीबीचे पथकाने शनिवार, 20 रोजी साक्री तालुक्यातील कुसुंबा गावाजवळ सापळा रचला. इनोव्हा कार (जी.जे.16 बी.बी.2607) आल्यानंतर तिची तपासणी केली असता 51 हजार 250 रुपये किंमतीचा गुंगीकारक औषधांचा साठा जप्त करण्यात आला तर संशयीत
एजाज रफिक शेख (25, रा.सुरत, गुजरात) यास अटक करण्यात आली तर दहा लाख रुपये किंमतीचे वाहनही जप्त करण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, उपनिरीक्षक चेतन मुंढे, अंमलदार आरीफ पठाण, संदीप साहेबराव पाटील, राहुल सानप, संदीप जगन्नाथ पाटील, देवेंद्र ठाकूर, प्रशांत माळे, विवेक वाघमोडे, अमोल पाटील, संजय सुरेस आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

