यावल शहरातील 47 वर्षीय इसमाचा नदीच्या डोहात मृतदेह आढळला


The body of a 47-year-old man from Yaval city was found in a deep pool of the river यावल (24 जून 2026) : यावल शहरातील देशमुखवाडा भागातील रहिवासी एका 47 वर्षीय इसमाचा श्री तारकेश्वर महादेव मंदिराच्या पाठीमागे हळकाई नदीच्या पात्रात मृतदेह आढळला. मृत इसम हा पाण्याच्या डोहात बुडालेल्या अवस्थेत आढळल्यानंतर त्यांना तिथून ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.आहे.

डोहात आढळला मृतदेह
शहरात देशमुखवाडा भागातील रहिवासी किरण शिवाजी देशमुख (47) हे 22 जून रोजी सकाळी घरात दिसून न आल्याने त्यांचा शोध सुरू करण्यात आला असतानाच यावल शहरातील श्री तारकेश्वर महादेव मंदिराच्या पाठीमागे असलेल्या हडकाई नदीच्या पात्रात एका डोहात एकाचा बुडून मृत्यू झाल्याचे कळाल्यानंतर नातेवाईकांनी धाव घेतली असता मयत हे किरण देशमुख असल्याची खात्री पडली. यावल पोलिसांनी मृतदेहन ग्रामीण रुग्णालयात हलवला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निलेश चौधरी करीत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !