अमळनेरच्या महिलेची जेईई क्लासच्या निमित्ताने पावणेतेवीस लाखात फसवणूक


Woman from Amalner defrauded of ₹23.75 lakh over JEE coaching classes अमळनेर (24 जून 2026) : मुलीच्या जेईई ऑनलाईन बायज्यू क्लाससाठी आणि नोट साठी महिलेकडून सायबर भामट्यांनी तब्बल पावणेतीन लाखांची फसवणूक केली. सायबर चोरट्यांनी फसवणुकीचा नवीन प्रकार समोर आणला असून नागरिकांनी ऑनलाईन कुठल्याही जाहिरातींना संपर्क साधताना जरूर विचार करावा, असे आवाहन यंत्रणेने केले आहे.

काय आहे प्रकरण
अमळनेरातील ज्योती विनोद सोनार (41) यांनी सायबर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, फसवणुकीचा प्रकार 29 ऑक्टोबर 2024 ते 2 जून 2026 दरम्यान घडला. सोनार यांची कन्या सेंट मेरी शाळेत शिक्षण घेते. बायज्यू क्लास लावण्यासाठ महिलेने मोबाईल क्रमांकासह सर्व माहिती संकलीत केल्यानंतर सचिन राठोड यांनी महिलेला संपर्क केला व ऑनलाईन मिटिंग घेतली. मुलीला जेईई क्लास लावण्यासाठी सुरूवातीला एक लाख नऊ हजार 500 रुपये लिंक पाठवून स्वीकारले व नंतर एकूण अडीच लाख रुपये फी सांगितली. मेस आणि हॉस्टेल फी वेगळी सांगितली होती. नंतर शरद पवार यांनी उर्वरित पैसे हप्त्याने देण्यास सांगितले. त्यांनी दुसर्‍याचा आय.डी.देऊन मुलीला क्लास जाईन करायला सांगितले मात्र काहीच तास होत होते शिवाय नोटस्देखील मिळाल्या नाहीत म्हणून महिलेला शंका यायला लागली.


आय.डी.देवून केली फसवणूक
महिलेने अधिक चौकशी केल्यानंतर दुसराच आय.डी.देऊन फसवले गेल्याचे लक्षात आले. महिलेला लगेच गणेश कुमार मीना यांच्या मोबाईल वरून आम्ही अधिकारी आहोत, तुमचे पैसे काढून देतो म्हणून संपर्क करण्यात आला. संशयीताने वर्दीवरील आय.डी .आणि काही बैठकीचे फोटो पाठवून त्याच्या सोबत अनुज कुमार आणि प्रदीप कुमार मीना या सर्वांनी वेगवेगळ्या मोबाईल वरून खाते बदल, अपडेट अशा वेगवेगळ्या कारणाने सुमारे 21 लाख 65 हजार 637 रुपये फोन पे ने स्वीकारले. एकूण 22 लाख 75 हजार 137 रुपयात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सोनार यांनी सायबर पोलिसात तक्रार दिल्यानंतर संशयीत सचिन राठोड, शरद पवार, गणेश कुमार मीना, अनुज व प्रदीप कुमार मीना आदींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तपास पोलीस उपअधीक्षक सतीश गोराडे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !