धरणगाव तालुक्यात भीषण अपघातात तिघे ठार

भरधाव दुचाकी समोरा-समोर धडकल्यानंतर अपघात : एक जण गंभीर जखमी


Three killed in a horrific accident in Dharangaon Taluka धरणगाव (24 जून 2026) : भरधाव दुचाकी समोरा-समोर आदळून झालेल्या भीषण अपघातात तिघे ठार झाले. हा अपघात धरणगाव तालुक्यातील पाळधीनजीकच्या सावदा-रिंगणगाव मार्गावर सोमवार. 22 जून दुपारी सुमारे दोन वाजता घडला.

भीषण अपघातात तिघांचा मृत्यू
या अपघातात किरण बाबूलाल राक्षे-मराठे (38, रा.पथराड, ता.धरणगाव), चेतन भिकन पाटील (35, रा.वाडेगुढे, ता.भडगाव), प्रदीप उखा निकम (40, रा.गोंदेगाव-निंभोरा, जि.छत्रपती संभाजीनगर) यांचा जागीच मृत्यू झाला तर बाबूलाल राक्षे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


समोरा-समोर धडकल्या दुचाकी
मिळालेल्या माहितीनुसार, किरण राक्षे हे पद्मालय येथे लग्न समारंभासाठी गेले होते. समारंभ आटोपून ते आपल्या वडिलांसह दुचाकीवरून घरी परतत असताना पाळधीनजीक समोरून येणार्‍या दुसर्‍या दुचाकीशी त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की तिन्ही जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणीनंतर किरण राक्षे, चेतन पाटील आणि प्रदीप निकम यांना मृत घोषित केले. चेतन पाटील आणि प्रदीप निकम हे मित्र असून नातेवाईकांना भेटून जळगावच्या दिशेने परतत असताना हा दुर्दैवी अपघात घडल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात झिरो क्रमांकाने गुन्हा नोंदविण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !