केतन अग्रवालचा मृत्यू अपघात नव्हे तर खूनच : भावी पत्नीसह प्रियकराला बेड्या


Ketan Agrawal’s death was murder, not an accident; fiancée and her lover arrested लोणावळा (24 जून 2026) : लोणावळा येथील लोहगड किल्ल्याहून पडून केतन अग्रवाल या बड्या घरच्या तरुणाचा मृत्यू झाला. सुरूवातीला वाटणारा हा अपघाताचा प्रकार पोलिस तपासात खुनाचा निष्पन्न झाला आहे. तरुणाची भावी वधू सिया गोयल हिने प्रियकर चेतन चौधरीसोबत अतिशय थंड डोक्याने प्लॅन करीत तरुणाची हत्या केल्याचे उघड झाले असून आता दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण ?
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवालची 18 जून रोजी लोहगडावरील दरीत ढकलून देऊन हत्या करण्यात आली. केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल हिनेच तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्यासोबत कट रचून केतनची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. दरम्यान, सिया गोयल आणि तिचा प्रियकरसह सियाची आई पूजा गोयल आणि तिचा भाऊ आणि आत्या हेदेखील तितकेच दोषी असल्याचे मयत केतन अग्रवालची म्हणाली आहे.


फोन करीत मुलाला नेले
मयत केतनची आई म्ळणाले की, या घटनेल तरुणीची आई पूजा गोयही तितकीच जबाबदार आहे. 18 जूनलाही पूजा गोयलचा फोन आला होता. ती मला विचारत होती की, तुम्ही केतनला सियासोबत फिरायला का पाठवता? मी त्यांना सांगितले की, सिया हिच माझ्या मुलाला खेचून घेऊन गेली आहे. आमचे 20 जणांचं एकत्र कुटुंब आहे. आमच्या घरी सिया आली तेव्हा कोणालाही तिच्या डोक्यात वेगळेच काहीतरी सुरू असेल, याचा जराही अंदाज आला नाही. सिया आणि मी अनेकदा शॉपिंगला एकत्र गेलो आहोत. ती व्हिडीओ कॉलवरही माझ्याशी बोलायची. तेव्हा ती अत्यंत साधेपणाने आणि हसतखेळत बोलायची, असे केतन अग्रवाल याच्या आईने सांगितले.

तरुणाचा मृत्यू अपघाती नव्हे !
होणारी पत्नी सियासोबत केतन अग्रवाल हा लोहगड किल्ल्यावर गेला होता. तिथे सेल्फी घेत असताना खोल दरीत तो कोसळला, असे सांगण्यात आले मात्र उत्तम ट्रेकर असलेला केतन हा किल्ल्यावरून पडण्याची बाब शंकास्पद होती. सुरूवातीला हा फक्त अपघात दाखवण्यात आला मात्र हा अपघात नसून शांत डोक्याने कट रचला होता. केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतनला आपल्या रस्त्यातून काढण्यासाठी हे सर्वकाही रचले होते. केतनसोबतच्या लग्नाला सिया हिचा विरोध होता मात्र कुटुंबाने सिया आणि चेतन यांचे नाते माहिती असतानाही केतन याच्यासोबत तिचे लग्न जमवले.

लग्नासाठी दोन विमाने बुक
हायप्रोफाईल कुटूंबातील होणारे लग्न उदयपूरच्या महालमध्ये ठेवण्यात आले होते. नातेवाईकांना पुण्याहून उदयपूरला जाण्याकरिता दोन विमानाने बुक करण्यात आली होती. या लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. सिया हिने केतनला मारण्यासाठी सर्व नियोजन केले होते. केतन अग्रवाल याला लोहगडावर जायचे नव्हते. मात्र, याकरिता सिया त्याच्यावर दबाव टाकत होती. केतनला अगोदरच सियाच्या काही गोष्टींवर संशय येत होता.

केतनच्या वडिलांनीच याबाबत खुलासा केला. केतनने लोहगडावर जाण्यास नकार दिल्यानंतर तिने त्याच्या आईला फोन केला. लोहगडावर केतनला चला म्हणून सांगा याकरिता ती त्यांना फोर्स करत होती. शेवटी सुनेचा हट्ट पुरवण्यासाठी त्यांनी लोहगडावर जाण्यासाठी केतनला सांगितले, त्यानंतर तो सियाला घेऊन लोहगडावर केला आणि तिथेच त्याच्यासोबत मोठा घात झाला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !