बचत गटाच्या नावावर कर्ज काढून भालोदच्या महिलेची 74 हजारात फसवणूक


Woman from Bhalod defrauded of ₹74,000 through a loan taken out in the name of a self-help group फैजपूर (24 जून 2026) : बचत गटाच्या माध्यमातून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत यावल तालुक्यातील भालोदच्या महिलेची तब्बल 74 हजार 650 रुपयांची आर्थिक फसवणूक झाली. याप्रकरणी मंगळवारी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शबाना सिकंदर तडवी (28, रा. इंदिरानगर, भालोद, ता.यावल) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयीत आरोपी शैला अशोक भालेराव (रा. इंदिरानगर, भालोद ता. यावल) यांनी फिर्यादीकडून सुमारे 89 हजार रुपयांची भिशी टाकून घेतली होती. त्यापैकी मार्च 2026 पर्यंत 43 हप्ते भरले गेले होते.



दरम्यान, आरोपीने फिर्यादीच्या आधारकार्ड, पॅनकार्ड व इतर कागदपत्रांचा वापर करून उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेकडून जुलै 2025 मध्ये 40 हजार रुपयांचे कर्ज काढल्याचा आरोप आहे. सुरुवातीचे काही हप्ते भरल्यानंतर मार्च 2026 नंतर कर्जाचे हप्ते भरणे बंद करण्यात आले. त्यामुळे कर्जाची थकबाकी वाढून फिर्यादीवर आर्थिक भार पडला.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपीने केवळ तिच्याच नव्हे तर गावातील इतर महिलांच्या नावावरही विविध बँकांकडून कर्ज काढून आर्थिक फसवणूक केल्याचा संशय व्यक्त आहे. या प्रकारामुळे फिर्यादीला मुद्दल व व्याजासह एकूण 74 हजार 650 रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. तपास एपीआय संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निरज बोकील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !