यावल पोलीस ठाण्यातील दोघा तत्कालीन निरीक्षकांना पोलीस उपअधीक्षकपदी पदोन्नती
यावल (25 जून 2026) : यावल पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यभार पाहिलेल्या राकेश मानगावकर व सुधीर पाटील यांना पोलीस उपअधीक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे.
दोघा अधिकार्यांना पदोन्नती
राकेश मानगावकर यांची उपविभागीय पोलीस अधिकारी अर्थात डीवायएसपी मालेगाव ग्रामीण तर यावलला काम पाहिलेल्या सुधीर पाटील यांची देखील उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे ग्रामीणमधील साक्री येथे नियुक्ती करण्यात आली आहे.


यावल पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्य वाजवलेल्या या दोन्ही अधिकार्यांची पदोन्नती झाल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
